कराड (प्रतिनिधी) – येथील वारणा हॉटेलचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये झाले आहे. या सेंटरची पाहणी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी गुरूवारी केली.
गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. अशा रूग्णांची संख्या अधिक आहे. तर काहींचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अन्य ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, येथील वारणा हॉटेलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. यामध्ये 28 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील या नविन कोविड सेंटरसह पाटण तालूक्यातील ढेबेवाडी येथील ग्रामिण रूग्णालयातही 36 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन बेडचे काम चिंगळे सर्जिकलकडून करण्यात येत आहे.
ढेबेवाडीचे कोविड सेंटर अंतिम टप्यात आले असून वारणा हॉटेल मधील बेडचे काम युध्दपातळीवर सूरू आहे. येथील कामाची पाहणी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केली. नागरिकांच्या सोयीसाठी हे सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे येथील कामकाज तात्काळ सुरू करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.