सातारा: नगर वाचनालय पंचवार्षिक निवडणूक अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

सातारा – पश्चिम महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त आणि 168 वर्षांची परंपरा असलेले श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालय हे विख्यात आहे. या वाचनालयाच्या कार्यकारिणीची आणि विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शनिवार दिनांक 20 रोजी अखेरचा दिवस आहे. या निवडणुकीमध्ये विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड वर्ष 2021 ते 2026 या कालावधीत करता असेल.

रविवार दि. 21 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल तर बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. 28 नोव्हेंबर 2019 रोजी मतदान होईल आणि मतदान संपताच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल त्याच दिवशी नगर वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आयोजित करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या चार आणि कार्यकारी मंडळाच्या आठ अशा 12 जागांसाठी मतदान होणार असून यावर्षी अनेक दिग्गज साहित्यिक आणि व्यक्ती मैदानात उतरत असल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.