जिल्ह्यातील आणखी 122 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये दररोज सुमारे सव्वाशे अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालंमध्येही 122 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे दोन करोनाबाधितांचा मृत्यूदेखील झाला आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3097 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
शनिवारी आलेल्या 122 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे, कराड तालुक्यातील मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 28 वर्षीय महिला, ओंढओसी येथील 41 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 5 वर्षीय बालक, तारुख येथील 33 वर्षीय पुरुष, शिवडे, उंब्रज येथील 55 वर्षीय पुरुष, कापील येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 26 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 4 वर्षीय बालक, गोटे येथील 38, 17 वर्षीय महिला, वाकनरोड येथील 50 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड येथील 79 वर्षीय पुरुष, कुसूर येथील 65 वर्षीय महिला, कराड येथील 56 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 64 वर्षीय पुरुष, जाखीणवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, गोटे येथील 58, 41, 20, 24, 17 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, पेठ बु. येथील 75 वर्षीय पुरुष, सुपने येथील 60 वर्षीय महिला,
वाई तालुक्यातील शेंदूरजणे येथील 38, 15, 14, 35, 59 महिला, 12 वर्षाची युवती, 6 वर्षाची बालिका, 14 युवक, 34, 42 वर्षीय पुरुष, वेळे येथील 47 वर्षीय पुरुष, गोवेदिगर 65 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील 25, 58, 24 वर्षीय पुरुष, जामतळ येथील 58 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 34, 21 वर्षीय पुरुष, तळेकरवस्ती 50 वर्षीय महिला, शिरवळ येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला,
विंग येथील 46 वर्षीय महिला, शिरळ येथील 16 वर्षीय युवती, 22 वर्षीय शिरवळ, खंडाळा येथील 48, 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 65 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 19 वर्षीय महिला, नायगाव येथील 7 वर्षाचा बालक, खंडाळा येथील 26 वर्षीय महिला, 1 वर्ष 2 महिन्याचे बाळ. सातारा तालुक्यातील चिंचणेर येथील 58 वर्षीय महिला, वाढे फाटा, सातारा येथील 44 वर्षीय महिला, अमरलक्ष्मीनगर देगाव येथील 38 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 14 वर्षाची युवती, 52 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, 5 वर्षाची बालिका, 5 वर्षाची बालिका, 30 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, माची पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, अमरलक्ष्मी देगाव येथील 45 वर्षीय महिला, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सेवागिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, मोपरे येथील 49 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 29 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 40 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 31, 43 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 1 वर्षीय बालक, तडवळे येथील 50 वर्षीय महिला. जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुषाचाही अहवाल शनिवारी करोना पॉझिटिव्ह आला आहे. महाबळेश्वर येथील 75 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील वडूज येथील 66 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 71 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील रविवार पेठ, फलटण येथील 41 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 65 वर्षीय पुरुष, मलटण येथील 3 वर्षीय बालिका, 22 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील नेरले येथील 47 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, अंबराग येथील 55 पुरुष, 40 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालक, 55 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, म्हावशी येथील 42 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष, बीबी येथील 20 वर्षीय महिला, पाटण येथील 16 वर्षी युवती, निगडी येथील 35 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
सात जणांचा मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात निगडी (ता. कोरेगाव) येथील 80 वर्षीय पुरुष व कवठे (ता. खंडाळा) येथील 80 वर्षीय महिला तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वडूज (ता. खटाव) येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल करोनाबाधित आला होता. तसेच वडगाव हवेली (ता. कराड) येथील 49 वर्षीय पुरुष व रविवार पेठ कराड येथील 52 वर्षीय पुरुष या दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील उंब्रज येथील 87 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.