नागठाणे : बोरगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त कारभारी सपोनि संदीप वाळवेकर यांनी पहिल्या दिवसापासूनच अवैध दारू ,मटका अड्डयांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेत आनंदाचे वातावरण आहे. पोलीस ठाण्याकडील अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून छापासत्राचा अवलंब केला आहे.
त्याअंतर्गत दि. ३ रोजी अपशिंगे (ता. सातारा) येथे अवैध दारू अड्डयांवर छापा टाकून संशयित सागर विजय राठोड यास १ हजार ७५० तर दि. ४ रोजी अपशिंगे येथूनच नाना मसुगडे यास १ हजार ७५० रूपयांच्या रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. दि. ४ रोजी नागठाणे, ता. सातारा येथे अवैध मटका अड्डयांवर कारवाई करत अजय शितोळे, अनिकेत नामदेव साळुंखे, किशोर काळे, संजय कुंभार या संशयितांसह ३ हजार ७४५ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
दि. ४ रोजी नागठाणे येथेच अवैध दारू अड्डयांवर छापा टाकून अविनाश अरविंद साळुंखे या संशयितास २ हजार ४५० रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. दि ४ रोजी कुमठे (ता. सातारा) येथे संशयित वैभव मोहन निमज याच्या अवैध दारू अड्डयांवर कारवाई करून दारूच्या बाटल्या व रोख रक्कम मिळून ११ हजार २१५ रूपयांचा मुद्देमाल संशयितासह ताब्यात घेतला. दि. ५ रोजी अतित (ता. सातारा) येथील अवैध दारू अड्डयांवर छापा कारवाई करून अंकुश शिवाजी सावेकर या संशयितासह अवैध दारू साठा व रोख रक्कम मिळून १६ हजार २३० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.एकुणच आतापर्यंत आठ ते नऊ कारवायांमध्ये ४३ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. एकूण १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कारवाया सुरू असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सपोनि वाळवेकर तसेच त्यांनी दिलेल्या आदेशावरून उपनिरिक्षक स्मिता पाटील, राजाराम निकम, सुधीर भोसले, सहाय्यक उपनिरिक्षक हिम्मत दबडे पाटील, प्रविण शिंदे हवालदार अमोल गवळी, मिलिंद कुंभार, संतोष चव्हाण, सुनिल कर्णे, पो. ना. प्रशांत चव्हाण, मनिषा म्हेत्रे, कॉ. केतन जाधव, सतीश पवार, विशाल जाधव, उत्तम गायकवाड यांनी या कारवाया केल्या आहेत.
अवैध व्यवसायांवर करडी नजर
सपोनि संदीप वाळवेकर हे कर्तव्यदक्ष, हुशार अधिकारी म्हणून ओळखले जातात. ‘लॉ’ चे शिक्षणही त्यांनी घेतले आहे. प्रथम सातारा शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. त्यानंतर त्यांच्यावर डायल ११२ या यंत्रणेची जबाबदारी देण्यात आली. पुसेसावळी (ता. खटाव) येथे घडलेल्या अप्रिय घटनेवेळी संवेदनशीलता व बुद्धीचातुर्याने दोन समाजांमध्ये समन्वय निर्माण करून समाजजीवन पुर्वपदावर आणण्यात मोलाचा वाटा होता. त्यानंतर पोलीस अधिक्षक समीर शेख यांचे वाचक म्हणुन कर्तव्य करत होते. अवैध व्यवसाय बंद करून चिरकुट गुंडांवर अंकुश ठेवुन कायदा व सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले .