महाबळेश्वर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री वाट चुकून एक महाकाय गवा आल्याने येथील लोकांची धांदल उडाली. परंतु, कोणालाही काही इजा न करता हा गवा मार्गस्थ झाला.
यापूर्वीही गव्याने महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठेतून रात्री रपेट मारली तर येथील बस स्टँड परिसरात देखील रात्री गव्याचे दर्शन झाले होते.