मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

पाटण तालुक्यातील चाफळ खोनोलीत तणाव : पोलिस बंदोबस्तात वाढ

सातारा – मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलना दरम्यान जखमी झालेल्या रोहन तोडकर (वय २१, मु. चाफळ खोनोली, ता. पाटण) या तरुणाचा आज मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे झालेल्या दगडफेकीत रोहन जखमी झाला असून डोक्याला गंभीर इजा झाली होती. जे. जे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुधवारी मुंबईसह अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई वगळता इतर ठिकाणी दुपारनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. कोपरखैरणेतही हिंसाचार करत दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये रोहन तोडकर जखमी झाला होता. उपचारासाठी रोहन तोडकरला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

तोडकर हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चाफळ खोनोली गावचा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच गावात तणावाचे वातावरण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)