कोयनानगर – कोयना धरणातून आज दि. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सांडव्यावरुन आणखी दहा हजार क्युसेक पाणी सोडून ४०,००० क्युसेक विसर्ग नियोजित होता. तथापि, पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे ही वाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्युसेक विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग ३२१०० क्युसेक आहे.
हे वाचाल का ?
कोयनेतून आज दुपारी बारा वाजता आणखी १० हजार क्युसेक पाणी सोडणार