विडणी : विडणी, ता. फलटण गावातील राजे गटाच्या युवक कार्यकर्त्यांनी गावचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
विडणी येथील युवक कार्यकर्ते पोपट वाघमारे, रोहित जगताप, आकाश घाडगे, धीरज जगताप, अक्षय मोरे, प्रवीण मोरे, करण रणदिवे, अभिषेक मोरे, रोहित निकाळजे, सूरज खरात, सूरज जगताप, ओम वाघमारे, ऋषिकेश वाघमारे, नागेश वाघमारे, प्रमोद जगताप आदी तरुण युवकांनी युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विडणी गावचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांनी गेल्या २ वर्षात गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. कोट्यवधी रुपयांची विकासकामे विडणी गावात चालू असून या विकासकामांच्या जोरावर विरोधकांच्या मनात देखील सरपंच अभंग यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामुळे गावातील राजे गटाचे अनेक मातब्बर पुढारी, युवक सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.