कराड (प्रतिनिधी) – गुरूवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने कराड शहराला अक्षरश: झोडपून काढले. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणीचपाणी साचले होते.
गुरूवारी सकाळपासून हवेत उष्णता जाणवत होती. परंतु, पावसाचे चिन्ह कोठेच दिसत नव्हते. दुपारी तीनच्या सुमारास अचानक मुसळधार पावसास सुरूवात झाली. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
सुमारे अर्धा तास हा पाऊस पडत होता. मात्र, या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. दत्त चौक परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती साचलेल्या पाण्यातून कसरत करत वाहनधारकांना प्रवास करावा लागला. काही विश्रानंतर साडे चार वाजता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ऊन पावसाच्या या खेळामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढणार आहेत.