साताऱ्यात पावसाच्या सरी

सातारा -रविवारी दुपारी साताऱ्यात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

गत आठवडाभरापूर्वी आलेल्या मान्सूनपूव पावसाने मान्सूनच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, दोन दिवस पडलेला पाऊस बंद झाला आणि पुन्हा कडक ऊन पडू लागले. मात्र, रविवारी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केली. कराडसह काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

तर सातारा शहरात पावसाने अवघा काही काळ शिडकावाच केला. दुपारी साताऱ्यात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या वातावरणामुळे मुसळधार पाऊस पडेल अशी आशा सातारकर नागरिकांना होती.

Leave A Reply

Your email address will not be published.