पुणे, साताऱ्यामधील 21 हजार नागरिकांची तहान टॅंकरवरच

file photo

पुणे – जुलै महिना संपत आला तरी पुणे व सातारा जिल्ह्यांतील 74 वाड्यावस्त्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील 21 हजार 862 नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सर्वत्र चांगला पाऊस होत असला तरी अजूनही काही तालुक्‍यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, कोरेगाव या तीन तालुक्‍यांमध्ये तर पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड तालुक्‍यांमध्ये टॅंकर सुरूच आहेत. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, इतका पाऊस न झाल्याने या पाच तालुक्‍यांमधील 15 गावांतील 74 वाड्यावस्त्यांमध्ये अजूनही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या बाधित नागरिकांची संख्या 21 हजार 862 इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील 2 गावांमधील 6 हजार 123 नागरिकांना, दौंडमधील 1 गावांमधील 1 हजार नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खटाव, माण, कोरेगाव या तीन तालुक्‍यांमधील 12 गावांमधील 14 हजार 724 नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये एकही टॅंकर सुरू नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)