बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक

सातारा – बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी अटक केली आहे. मुंबईच्या फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या घरातूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चेक बाउन्स प्रकरणात सातारा न्यायालयाने बिचुकलेच्या विरोधात वॉरन्ट जारी केलं आहे. याचप्रकरणी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. मुंबई पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेला ताब्यात घेतलं आहे.

अभिजीत विचुकलेला सातारा न्यायालयात हजर केलं जाणार असून तो स्पर्धेत कायम राहणार की नाही याचा निर्णय उद्याच घेण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस बिग बॉसच्या घरात पोहोचल्यावर अभिजीत कोणताही वाद न घालत त्यांच्यासोबत घरातून बाहेर आला.

दरम्यान, अभिजित बिचुकले हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत राहिलेला स्पर्धक आहे. साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे. याच ओळखीवर त्याला बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळाली होती. बिग बॉस मराठीचे हे सिझन सुरू झाल्यापासूनच वादग्रस्त विधानांमुळे राजकीय नेता अभिजित बिचुकले बीग बॉसच्या घरात आणि प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

बिग बाॅसमध्ये सहकलाकार रूपाली भोसले हिच्या घटस्फोटाचा उल्लेख करत तिच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना बीग बॉस मराठीच्या घरातून हाकला, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)