सातारा- पंढरपूर मार्गाला महामार्गाचा दर्जा कधी?

सातारा – सातारा जिल्ह्यातूनही अनेक राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. पुणे-बेंगलोर या चार क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच आता सातारा-पंढरपूरमार्गे पुढे जाणाऱ्या महामार्गाचे कामही सुरू आहे. तसेच कोकणातून पाटणवरून मायणी, पंढरपूरकडे जाणाजया राष्ट्रीय मार्गाचेही ठिकठिकाणी काम सुरू झाले आहे.

असे असताना जिल्ह्यातून जाणाजया आणखी एका राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला; पण त्याचे हस्तांतरण झाले नाही, त्यामुळे कामे सुरू झाली नाहीत. हा मार्ग लोणंदवरून साताजयाला येणारा असून, त्याला राज्यमार्ग 117 हा क्रमांक आहे. पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथे सुरू होणारा राज्यमार्ग 117 हा लोणी, पाबळ, शिक्रापूर, आष्टापूर, उरळी कांचन, जेजुरी, नीरा, लोणंद, वाठार स्टेशन आणि सातारा असा आहे. पूर्वी या रस्त्याला राज्यमार्ग 61 हा क्रमांक होता. 2001 ते 2021 च्या रस्ते विकास नियोजनात तो सुधारित झाला.

याच मार्गाला आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अशी मंजुरी मिळाली आहे. हा महामार्ग आता केडगाव, चौफुला, मोरगाव, नीरा, लोणंद, सातारा असा असणार आहे; पण या रस्त्याचे अद्यापही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरण झालेले नाही. केंद्र शासनाने गॅझेट काढल्यानंतरच हा महामार्ग प्रत्यक्षात वर्ग होणार आहे. या नवीन महामार्गाची सातारा जिल्ह्यातील लोणंद ते सातारा अशी 53 किलोमीटर लांबी आहे. रस्त्याचे हस्तांतरण झाल्यानंतर रुंदीकरण, पुलाची कामे, भूसंपादन आदी कामे सुरू होणार आहेत. आता या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित होऊन वर्ष होऊनही हस्तांतरण झाले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×