जिल्ह्यात नवे 279 जण पॉझिटिव्ह, करोनाचे एकूण बळी 206
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील करोनाचा उद्रेक वाढतच असून गुरूवारी नऊ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर बुधवारी 279 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे करोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांची संख्या 206 झाली आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 6504 झाली आहे.
जिल्ह्यात आणखी नऊ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले नरवणे, ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन, ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी, ता. पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, मुंबई येथून म्हसवड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेला आणि तिथून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय येथे सदंर्भित केलेला 38 वर्षीय पुरुष, सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले सह्याद्रीनगर, वाई येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ, ता. जावळी येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ, कराड येथील 69 वर्षीय पुरुष, काळगाव, ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष व गोटे, ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, या बाधितांचा मृत्यू झाला.
या 279 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कराड तालका ः चोरे एक महिला, जुळेवाडी एक महिला, अनतावाडी एक पुरुष, विद्यानगर एक पुरुष, येरावळे एक महिला, काले दोन, कापिल एक पुरुष, एक महिला, सैदापूर एक पुरुष, दोन महिला, मलकापूर चार पुरुष, एक महिला, नायगाव एक पुरुष, एक महिला, वडगाव एक पुरुष, येणके एक पुरुष, एक महिला, नांदगाव एक पुरुष, वडोली निळेश्वर एक पुरुष, एक महिला, कार्वे नाका एक पुरुष, कालवडे 6 पुरुष, 5 महिला, सावड एक पुरुष, वडज एक पुरुष, बेलवडे बुद्रुक दोन पुरुष, एक महिला, टेंभू एक महिला, बेलवडे एक पुरुष, गुणेवाडी एक महिला, गोटे एक महिला, पेठ शिवापूर एक पुरुष, कोयना वसाहत एक पुरुष, मंद्रुल कोळे तीन महिला, आसवली एक पुरुष, पाली एक महिला, कराड येथील दोन पुरुष, चार महिला, शनिवार पेठ नऊ पुरुष,
रविवार पेठ दोन पुरुष, बुधवार पेठ एक महिला, गुरुवार पेठ एक महिला, मंगळवार पेठ एक पुरुष, दोन महिला,
सोमवार पेठ दोन पुरुष, रेव्हेन्यू कॉलनी एक पुरुष, मार्केट यार्ड एक पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी एक पुरुष, बैलबाजार रोड 10 वर्षाचा मुलगा. वाई तालुका ः सोनगीरवाडी एक पुरुष, फुलेनगर एक महिला, रविवार पेठ एक पुरुष, यशवंतनगर एक पुरुष, गंगापुरी एक महिला, सह्याद्रीनगर एक महिला, वरागडेवाडी एक महिला, किसनवीरनगर वाई एक पुरुष, उडतारे एक पुरुष. फलटण तालुका ः रविवार पेठ एक पुरुष, तामखडा दोन महिला, मंगळवार पेठ एक पुरुष, सिमेंट रोड एक पुरुष, मलठण एक पुरुष, एक महिला. सातारा तालुका ः सातारा तीन पुरुष, एक महिला, शनिवार पेठ नऊ पुरुष, 12 महिला, गुरुवार पेठ एक पुरुष, मंगळवार पेठ एक पुरुष, गुरुवार पेठ एक पुरुष, देवी चौक एक पुरुष, बुधवार पेठ एक पुरुष, सोमवार पेठ एक पुरुष, व्यापार पेठ एक महिला, संगमनगर दोन पुरुष, संभाजीनगर एक पुरुष, प्रतापगंज पेठ एक पुरुष, एक महिला, गोडोली एक पुरुष, शाहूपुरी एक पुरुष, पाच महिला, खडकी एक पुरुष, वाढे फाटा एक महिला, डबेवाडी एक महिला, अतीत सहा पुरुष, चार महिला, धावडशी तीन पुरुष, दोन महिला, निगुडमाळ एक पुरुष, नागठाणे दोन पुरुष, चार महिला, वासोळे दोन पुरुष, एक महिला, शिवथर दोन पुरुष, दोन महिला,
भरतगाववाडी एक महिला, करमाळा एक पुरुष, सैदापूर एक पुरुष, जकातवाडी एक पुरुष, खंडाळा तालुका ः लोणंद पाच पुरुष, एक महिला, शिंदेवाडी एक पुरुष, एक महिला, धनगरवाडी एक पुरुष, एक महिला, 12 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा बालक, पळशी एक महिला, एक पुरुष, जावळे एक पुरुष, शिरवळ सात पुरुष, तीन महिला, 9 वर्षाचा बालक, 5 वर्षाची बालिका, 5 वर्षाचा बालक, 10 वर्षाचा बालक, दरे खुर्द दोन महिला, एक पुरुष, खंडाळा येथील दोन पुरुष, पळशी एक पुरुष. कोरेगाव तालुका ः पिंपोडे बुद्रुक एक पुरुष, रहिमतपूर तीन पुरुष, चार महिला, 3 वर्षाचा बालक, 10, 9 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, कोरेगाव एक महिला, कुमठे एक पुरुष, एक महिला, कोरेगाव दोन पुरुष. माण तालुका ः म्हसवड एक पुरुष, एक महिला,. जावळी तालुका ः कुडाळ दोन पुरुष, एक महिला. पाटण तालुका ः गारवडे एक पुरुष, मल्हारपेठ एक पुरुष, ढेबेवाडी एक पुरुष, महाबळेश्वर तालुका ः स्कूल मोहल्ला, महाबळेश्वर 20 पुरुष, सहा महिला, तळदेव एक पुरुष, देवळी एक पुरुष, पाचगणी बेल एअर हॉस्पिटल एक पुरुष. खटाव तालुका ः जायगाव एक पुरुष, येळीव दोन पुरुष, एक 24 वर्षीय महिला. याशिवाय शिराळा एक पुरुष, चिंतामणीनगर (सांगली) एक पुरुष.