हर्षद कदम यांच्याविरोधात दमदाटी, मारहाणीची तक्रार

पाटण -आमचा नकार असताना माझ्या मुलीचे लग्न (प्रेमविवाह) तुम्ही जुळवून का दिले याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेस शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी तू कोण, मी तुला ओळखत नाही असे म्हणून दम भरला. त्यानंतर त्या महिलेस घरातून ओढून आणून ग्रामपंचायतीसमोर मारहाण केल्याची फिर्याद पाटण पोलिसात दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार सदरची घटना 26 जानेवारी रोजी घडली आहे. दरम्यान या घटनेने पाटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.
याबाबत शारदा आनंदराव गुजर (वय 48, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) यांनी पाटण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी हिचे लग्न मल्हारपेठ येथील महालिंग अशोक सगरे याच्याशी झाले. या प्रेमविवाहास माझा विरोध होता. मात्र मल्हारपेठ येथील भानुप्रताप उर्फ हर्षद मोहन कदम यांनी हे लग्न जुळविले. याचा जाब विचारला म्हणून मला मालन कदम, स्वप्नाली कदम, अनुसया कदम, मनिषा कदम यांनी घरातून ओढत आणून ग्रामपंचायतीसमोर मारहाण केली. तर निवास कदम, विकास कदम, रणजित कदम यांनी माझे दीर व पुतण्याला घरात येऊन धकाबुक्की केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, दुसरीकडे मनिषा निवास कदम (रा. मल्हारपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शारदा गुजर आणि चंद्रकांत पानसकर, विजया पानस्कर, विश्‍वजित पानस्कर यांचेविरुध्द पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. मनिषा कदम यांनी म्हटले आहे की, माझे दीर हर्षद कदम यांचे शारदा गुजर यांनी तू माझ्या मुलीस पळून जाण्यास फूस लावलीस असे म्हणत धक्काबुक्की केली. याचा जाब विचारला असता शारदा हिने माझ्याशी झटापट केली. त्यात माझे अडीच तोळे सोन्याचे घंटण चोरीस गेले. अधिक तपास ए. एस. आय. संतोष कोळी व गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)