उंब्रज (प्रतिनिधी) – जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती निवारण कायद्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हिंगनोळे ता.कराड येथील दोन मटन विक्रेत्यांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केली. गुलाब अहमद खालीपा (वय६०), विठ्ठल भिकू सरगर (वय५०) दोघे रा.हिंगनोळे ता. कराड अशी कारवाई केलेल्यांची नांवे आहेत.
याबाबत पोलिसांनी माहिती अशी की, जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती निवारण कायद्याचा आदेशाचा असताना चिकण मटण विक्री करण्यासाठी बंदी असताना हिंगनोळे येथील रोडकडेला गुलाब खालीपा व विठ्ठल सरगर यांनी बोकड कापून मटन विक्री करण्याच्या उद्देशाने लोकांची गर्दी जमवली यावरून दोघा जणांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली. सदर कारवाईची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे.