पाचवडमध्ये 17 हजारांचा गुटखा जप्त

भुईंज – पाचवड, ता. वाई येथे पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला 17 हजारांचा गुटखा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी विश्‍वनाथ बाबुराव शेवाळे या विक्रेत्यास अटक करण्यात आली आहे.

भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाचवड, ता. वाई येथील पानपट्टी चालक विश्वनाथ बाबुराव शेवाळे वय 59 रा. पाचवड हे गुटखा विक्रीवर बंदी असूनही गुटख्याची विक्री करत होते. याची माहिती सपोनि बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, महिला पोलिस सोनाली क्षीरसागर या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेथे छापा टाकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी शेवाळे गुटख्याची विनापरवाना विक्री करताना पथकाने रंगेहाथ पकडले. शेडची झडती घेतली असता 17 हजार 161 रुपय किंमतीचा गुटखा आढळून आला. विश्वनाथ शेवाळे यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)