क्रेडाई साताराच्या अध्यक्षपदी जयंत ठक्‍कर

सातारा -क्रेडाई अर्थातच कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या सातारा शाखेने अल्पावधीतच आपल्या कार्यामुळे देशभर ठसा उमटवला आहे. क्रेडाई सातारा शाखेची ही घोडदौड बघता देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी सातारा शाखेला मिळेल यात शंका नाही असे उद्‌गार क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी काढले.

क्रेडाई सातारा शाखेच्या पदग्रहण समारंभप्रसंगी शांतिलाल कटारिया बोलत होते. यावेळी क्रेडाई सातारा शाखेच्या अध्यक्षपदी जयंत (बाळासाहेब) ठक्‍कर यांनी तर सेक्रेटरीपदी विवेक निकम, उपाध्यक्षपदी सुधीर शिंदे, जाईंट सेक्रेटरीपदी मजिद कच्छी व खजिनदारपदी सागर साळुंखे यांनी सन 2019 ते 2021 या कालावधीसाठी पदाची सूत्रे माजी अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर व सेक्रेटरी सुधीर शिंदे यांच्या हस्ते स्वीकारली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रेडाई सातारा वुमनविंगच्या सिटी कोऑर्डिनेटरपदाची सूत्रे सौ. ज्योती ठक्‍कर यांनी क्रेडाई नॅशनला वुमन विंगच्या अध्यक्षा श्रीमती दर्शना परमार -जैन यांच्या हस्ते स्वीकारली. यावेळी नम्रता देशमुख, क्रेडाई कराड, फलटण, बारामतीचे पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी, क्रेडाई व बीएआयचे सदस्य, मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नूतन अध्यक्ष बाळासाहेब ठक्‍कर यांनी दोन वर्षात करणाऱ्या कामांचा संकल्प उपस्थितांना दिला. सर्व प्रमुख पाहुणे, निमंत्रीत व पदाधिकारी यांचा सातारा क्रेडाई तर्फे बुके, सन्मानचिन्ह देऊन श्रीधर कंग्राळकर , सुधीर शिंदे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय आगटे व आभघरप्रदर्शन सुधीर शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)