सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस दि. ३० मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कोणीही हार, बुके, शाल- श्रीफळ अथवा भेटवस्तू आणू नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.
दरम्यान, भेटवस्तू ऐवजी वह्या आणाव्यात. भेट म्हणून आलेले शालेय साहित्य गोर- गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणारे पदाधिकारी, मान्यवर यांच्यासह नागरिक हार, बुके, शाल- श्रीफळ अथवा भेटवस्तू घेऊन येत असतात.
हार, बुके शाल- श्रीफळ ऐवजी वह्या भेटवस्तू म्हणून दिल्यास त्या वह्या गोर-गरीब विद्यार्थ्यांना देता येतील आणि आपण दिलेली भेटवस्तू सत्कारणी लागेल, त्यामुळे कोणीही हार, बुके शाल- श्रीफळ आणू नये त्याऐवजी वह्या भेट म्हणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.