गोरे म्हणजे माण तालुक्यात पसरलेले विष

सातारा – माण मतदारसंघाचे आमदार गोरेंचे काम अन् बोलणे दोन्हीही घाणेरडे आहे. गोरे म्हणजे माण तालुक्यात पसरलेले विष असल्याचा घणाघात माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केला. ते सातार्‍यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई व पदाधिकारी उपस्थित होते.

येळगावकर म्हणाले, उद्योग धंदे माण तालुक्यात येण्यासाठी मोठी जोखीम त्यांनी घेतल्याचे सांगत असले तरी माणला आलेला सोलर प्रोजेक्ट कुणामुळे गेले हे त्यांनी जनतेला सांगावे. तसेच ते हनीमून झाल्याचे सांगत आहेत ते खरच आहे. कारण त्याचे हनीमून कोणासोबत झाले हे पोलिसांनी याअगोदर जनतेसमोर आणले आहे. गोरे हे रोज एका पक्षाच्या दारात असतात त्यामुळे ते कुणाकुणासोबत जातात हे कळत नसल्याने त्यांचा बाहेरख्यालीपणा समजण्यापलीकडचा आहे. मायणीला पाणी नसल्याचे सांगता पण त्याआगोदर बोराटवाडीची काय अवस्था आहे ते पहा असा सल्ला येळगावकरांनी दिला. पाणी आणल्याचे सांगणारे आमदार सांगलीला जाणार्‍या उरमोडीच्या पाण्याला थांबवण्यासाठी काय केले याचा खुलासा करावा. घाणेरडे बोलून जनतेची करमणुक करण्यापेक्षा आमदारांनी आत्मपरीक्षण करावे असेही येळगावकर म्हणाले.

साखपुडा न करताच गोरेंनी नक्की कुणाशी हनीमून केले असा सवाल विचारताना अनिल देसाई म्हणाले अशी प्रवृत्ती काय असेल याचा विचार करा. लवकरच मुख्यमंत्र्याना भेटून गोरेंचे कारनामे सांगणार आहोत, असेही देसाई म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.