सातारा : येथील श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ सातारा यांच्यावतीने महाराजांच्या 147 व्या प्रकटदिन उत्सवानिमित्त अर्कशाळानगर, शाहूपुरीतील गजानन महाराज मंदिरात रविवार दि. 16 पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अनिल देशपांडे यांनी दिली.
दि. 16 रोजी सकाळी 7 ते 1 या वेळेतगजानन विजय ग्रंथाचे एकदिवसीय पारायण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी महाआरती व नामस्मरण होईल. यंदाचा प्रकटदिन सोहळ्याचा कार्यक्रम दि. 16 ते 20 फेब्रुवारी अखेर होणार आहे. मंगळवारी 18 रोजी दुपारी महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी महाआरती व नामस्मरण, रात्री 7.30 ते 9 या वेळेत ब्रह्मचैतन्य गायन सेवामंडळाचा मराठी भावगिते व भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी 19 रोजी सकाळी शांतीपाठ, संकल्पपूर्वक नांदी श्राद्धांत, पुण्याहवाचन, आचार्य वरण, आचार्य कर्म, स्थलशुद्धी, बुद्धीमंडल, देवता स्थापना, गजानन महाराज स्थापना, श्रीरामचंद्र पंचायतन देवता स्थापना, महाभिषेक पूर्वक षोडषोपचार पूजा, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना पूजा, नवग्रह होम, मुख्य देवता हवन होईल. सायंकाळी 6 वाजता वारकंरी संप्रदायाचा माऊली भजन मंडळ, करंजे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर 7 वाजता महाआरती व नामस्मरण होईल.
गुरुवारी 20 रोजी सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी 7 ते 8.30 या वेळेत महाराजांच्या मूर्तीवर देशातील पवित्र नद्यांच्या जलाचा महाभिषेक व सिद्ध मंत्राचा नामघोष होईल. 8 ते 11 या वेळी पूजा, पवमान याग, श्रीराम यज्ञ, सिद्धमंत्र हवन, मृत्युंजय होम, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक व आशीर्वचन होईल. 11 वाजता गजानन विजय ग्रंथातील पहिल्या अभ्यायाचे सामुदायिक वाचन होईल. त्यानंतर नामस्मरण व 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद तर सायंकाळी 7 वाजता महाआरती व नामस्मरणाने या सोहळ्याची सांगता होईल. जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यातआले आहे.