सातारा | पुसेगावमध्ये चारचाकी आगीत जळून खाक…

पुसेगाव (प्रतिनिधी) – येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आज एका चारचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

निढळ (ता. खटाव) येथील रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने शेजारील रहिवाशाने त्यांच्याकडील चारचाकीतून त्या रुग्णाला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी एकच्या सुमारास आणले. रुग्ण दवाखान्यात गेल्यावर गाडी वळवताना बॅटरीजवळ शॉर्टसर्किट होऊन गॅस किट असलेल्या गाडीने पेट घेतला.

या आगीत चारचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही . पुसेगाव येथील भवानीनगर परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात निढळ येथील रुग्णाला घेऊन आलेल्या गाडीने पेट घेतला.

अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील अब्दागिरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे भान राखत योग्य ती उपाययोजना केली . चारचाकी गाडी त्या आगीत जळून खाक झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.