निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई

कोरेगाव – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 21 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत त्यांना तहसील कार्यालयातील प्रशिक्षण वर्गास हजेरी लावावी लागणार आहे. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ न दडवता त्वरित प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक रमाकांत झा यांनी केले.

कोरेगाव मतदारसंघातील मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गास झा यांनी भेट दिली व गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्याबाबत त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांना सूचना दिल्या.

दि. 12 व 13 एप्रिल रोजी झालेल्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिलपर्यंत तहसील कार्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गास हजर राहणे अनिवार्य असून, तेथेच प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे झा यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणासाठी हजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईडीसी व पीबीची पूर्तता करुन त्या सुविधा कक्षात जमा कराव्यात, अशा सूचना झा यांनी दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.