सातारा : जिल्ह्यात एका दिवसांत करोनाच्या रुग्णसंख्येने पाचशेचा उंबरठा गाठल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 495 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर उपचारादरम्यान एका बाधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एका बाधिताचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात 75 वर्षीय पुरुष (भांबे, ता. कराड) अशा एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने – 395293
एकूण बाधित – 63739
घरी सोडण्यात आलेले – 58983
मृत्यू – 1893
उपचारार्थ रुग्ण – 2863