सातारा, दि. १० (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून करोनाग्रस्तांची संख्या सोळाशेपार गेली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ५८ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यात सायंकाळी १२ जणांचे तर रात्री उशिरा ४६ जणांचे रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६०१ झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील १२ नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये वाई तालुक्यातील परखंदी येथील ६० वर्षीय महिला, ब्राम्हणवाडी येथील ७५ व २७ वर्षीय महिला, ओंकार गार्डन जेजुरीकर कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष, परसणी येथील ८५ वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील सरडे येथील ५० वर्षीय महिला व ५५ वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील गोकूळनगर येथील १५ वर्षीय तरुणी, मिरगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, बांबोडे येथील २१ वर्षीय तरुणी, कोयनानगर येथील ८५ व ५२ वर्षीय पुरुष.
रात्री उशिरा आलेल्या ४६ पाँझिटिव्ह रुग्णांची तपशीलवार माहिती उद्या सकाळी देण्यात येणार आहे.