Shivendrasinghraje Bhosale: छत्रपती शाहू क्रीडा संकुलातत आयोजित करण्यात आलेल्या सातारा डिस्ट्रिक्ट प्रिमियर लीगच्या ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ या भव्य नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नाणेफेक करून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. शहरातील क्रिकेटप्रेमी आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, नगरसेवक अविनाश कदम, बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक अक्षय जाधव. नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेवक जयवंत भोसले, नगरसेवक राजू गोरे, नगरसेवक निशांत पाटील, नगरसेवक दिलीप म्हेत्रे, सातारा पंचायत समिती सभापती महेश गाडे, निशांत गवळी, ओंकार भंडारी,विजय बडेकर, पत्रकार विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. Satara : महसूल थकविणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईच प्रतीक्षा; सातारा पालिकेचे दुर्लक्ष स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्रामीण व शहरी भागातील युवकांमध्ये क्रिकेटसह विविध खेळांविषयी प्रचंड उत्साह असून अशा स्पर्धांमधून अनेक गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले. क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून युवकांनी खेळातून संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण आत्मसात करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आयोजक अविनाश कदम मित्र समूह, महाराष्ट्र स्टेट वेटेरेन्स स्पोर्ट्स असोसिएशन फॉर ऑल स्पोर्ट्स यांच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुभेच्छा देत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले. रंगतदार प्रकाशझोत, जल्लोषपूर्ण वातावरण आणि क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शानदार पद्धतीने रंगला. शहरात क्रिकेटचा उत्सवच रंगला असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. Pune District : देवदत्त निकम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी