सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बुधवारी दि. 27) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 54 नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात माची पेठ, शाहूनगर, मल्हार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र चार, करंजे, बोरगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्यात कराड शहर दोन, वहागाव, शेणोली प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण दोन, ढेबेवाडी, अवसारी, तारळे, कुसरुन, मन्याचीवाडी प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात फलटण शहर दोन, कोराळे दोन, वाघोशी, अलगुडेवाडी, शिंदेवाडी प्रत्येकी एक,
वाई तालुक्यात वाई शहर एक, खटाव तालुक्यात निमसोड, दरुज, औंध, पुसेगाव प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हसवड पाच, गोंदवले बुद्रुक दोन, मोगे, दहिवडी, गोंदवले खुर्द, दिवड प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव, ल्हासुर्णे, कुमठे प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात पाडेगाव, खंडाळा प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी एक, इतर पाच, असे 54 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.