सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे.जावळी सोसायटी मतदारसंघातू त्यांचे प्रतिस्पर्धी ज्ञानदेव रांजणे विजयी झाले.
बँकेच्या ११ जागा बिनविरोध झाल्या तर दहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली.
जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील मतांची मोजणी प्रथम झाली. त्यात आमदार शशिकांत शिंदे एका मताने पराभूतझाले. एकूण ४९ मतांपैकी ४८ मते वैध ठरली. एक मत अवैध होते. शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली.
विजयी उमेदवार – ज्ञानदेव रांजणे
मतांचे लीड – 1