सातारा | जिल्ह्यात 245 रेमडेसिविरचे ‘या’ 67 रुग्णालयांना वाटप

सातारा (प्रतिनिधी) – गंभीर स्वरूपाच्या करोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्‍शन जिल्ह्याला टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. जिल्ह्यात आरोग्य विभागाला गुरुवारी 245 रेमडेसिवीर इंजेक्‍शन मिळाली असून, 67 रुग्णालयांना त्यांचे वाटप करण्यात आले. रेमडेसिवीर उपलब्धतेचे प्रमाण कमी झाल्याने आयसीयू व ऑक्‍सिजन बेडस्‌च्या 12 टक्के प्रमाणात वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल, संजीवन प्रत्येकी चार, मंगलमूर्ती, समर्थ, दिवेकर हॉस्पिटल, श्वास, न्यू एमआयडीसी, समर्थ प्रत्येकी तीन, सिम्बॉयसिस पाच, साई अमृत सात, सातारा हॉस्पिटल, यशवंत, अजिंक्‍यतारा प्रत्येकी सहा, आरएच, चैतन्य पोलीस ऑक्‍सिजन, विघ्नहर्ता, सिद्धीविनायक, राहत हेल्थकेअर प्रत्येकी दोन, आशीर्वाद एक, 

कराडमधील कृष्णा हॉस्पिटल 23, सह्याद्री हॉस्पिटल 11, श्रद्धा क्‍लिनिक चार, कराड हॉस्पिटल पाच, राजश्री तीन, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, निरामय, देसाई, कोयना प्रत्येकी दोन, वाईतील स्पंदन हॉस्पिटल चार, बाबर तीन, गीतांजली दोन, संचेती, एसजेटी प्रत्येकी पाच, कोरेगावातील पाटील हॉस्पिटल चार, आरएच दहा, कोरेगाव हॉस्पिटल, धनंजय, श्री हॉस्पिटल, श्रीरंग प्रत्येकी एक, बेल एअर सात, 

लोणंदमधील श्री सिद्धीविनायक सात, मानसी, बालाजी प्रत्येकी तीन, आरएच खंडाळा, अलका प्रत्येकी दोन, स्वामी समर्थ एक, फलटणमधील निकोप हॉस्पिटल, लाइफलाइन प्रत्येकी सहा, सुविधा, सिद्धीनाथ प्रत्येकी चार, एसडीएच, स्पंदन प्रत्येकी तीन, श्री साई दोन, जीवनज्योत, श्री सिद्धीविनायक प्रत्येकी एक, 

म्हसवडमधील गलांडे हॉस्पिटल, जय भगवान, डीसीएचसी प्रत्येकी दोन, धन्वंतरी एक, पाटणमधील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह तीन, आरएच, ढेबेवाडी दोन, आयटीआय कॉलेज, मरळी चार, आरएच, मेढा तीन, आयएमएसआर मेडिकल कॉलेज, मायणी दहा, आरएच, औंध चार, निरामय हॉस्पिटल दोन, असे रेमडेसिवीर इंजेक्‍शनचे वाटप करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.