सातारा (प्रतिनिधी) : दारात कोंबड्या कापून चिकन विकत जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस हवालदार राहूल खाडे यांनी फिर्याद दिली आहे.
गुरुवार परज येथील एका घरासमोर लोक जमल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिसांनी त्या ठिकाणी घाव घेतली. यावेळी मुजम्मी हमीद पालकर, सलमान गफुर पालकर, शाहीद हमीद पालकर, जुबेर जावेद शेख ( सर्व रा.शनिवार पेठ सातारा) हे संचारबंदी असतानाही घरासमोर कोंबड्या कापून लोकांना चिकन विक्री करत असल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून विक्री केली जात नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.