करोनाबळींमध्ये पुन्हा वाढ झाल्याने सातारकरांची चिंता वाढली

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (सोमवार, दि. 14) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 832 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे, तर गेल्या 24 तासांमध्ये 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मंगळवारी दिली.

या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 9989 जणांच्या चाचण्या करण्यात आल्याने पॉझिटिव्हिटी रेट 8.32 टक्‍के एवढा घटला; परंतु करोनाबळींमध्ये पुन्हा झालेली वाढ चिंताजनक आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे 

– कराड 204 (24929), सातारा 192 (38183), खटाव 97 (18341), माण 66 (12445), फलटण 76 (27584), कोरेगाव 54 (15788), पाटण 42 (7771), खंडाळा 33 (11274), वाई 29 (12173), जावळी 25 (8134), महाबळेश्वर 2 (4182) व इतर 12 (1196) असे आजअखेर एकूण एक लाख 82 हजार करोनाबाधित आहेत. बाधितांच्या संख्येत कराडने सातारा तालुक्‍याला मागे टाकले असून, खटावमध्ये रुग्णसंख्या घटल्याने तालुका प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि कंसात आतापर्यंतच्या मृतांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे 

  • सातारा 12 (1160), कोरेगाव 5 (362), कराड 4 (730), खटाव 3 (455), खंडाळा 2 (146), पाटण 2 (174), जावळी 1 (185), माण 0 (245), महाबळेश्वर 0 (44), फलटण 0 (273), वाई 0 (320), असे आतापर्यंत एकूण 4094 करोनाबळी आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत एखादा अपवाद वगळता सातारा तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू होत असल्याने तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.