सातारा: इंधन दरवाढीवरून कॉंग्रेस आक्रमक

मोदी सरकारच्या विरोधात साताऱ्यात पेट्रोल पंपावर निदर्शने

सातारा  – देशात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डीझेल व गॅसच्या किमती रोज नवी उसळी घेत आहेत. या इंधन दरवाढीवरून आक्रमक झालेल्या युवक कॉंग्रेसच्यावतीने येथील राधिका रोडवरील कदम पेट्रोल पंपावर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

पेट्रोल, डीझेल व गॅसची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली. “मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल, डीझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे, मोदी तेरी तानशाही नही चलेगी नही चलेगी’ व अन्य घोषणा देण्यात आल्या.

केंद्र सरकारचे सर्व कायदे जनताविरोधी असून त्यातून सर्वसामान्यांचे शोषण होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली आहे. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.

या बाबींचा विचार करून पेट्रोल, डीझेलवरील अबकारी कर कमी करावेत, घरगुती गॅसचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, ऍड. दत्तात्रय धनवडे, नरेश देसाई, अतुल पवार, अभय कारंडे, सूरज कीर्तिकर, शरद पवार, ज्ञानेश्वर पवार, रजिम कलाल, रिजवान शेख, एकनाथ पिसाळ यांनी आंदोलनात भाग घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.