सातारा जिल्ह्यात जिलेबी विक्रेत्यांना दणका

प्रभात इफ़ेक्‍ट 

-विनापरवाना रस्त्यावर जिलेबी विक्री पडली महागात
-अन्न औषध प्रशासनाकडून 19 विक्रेत्यांवर कारवाई

-गुरुनाथ जाधव

सातारा – रस्त्यावर विनापरवाना जिलेबी विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील 19 विक्रेत्यावर अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. शहर तसेच जिल्ह्यात यात्रा, उत्सव काळात मोठ्या प्रमाणावरती अन्न पदार्थ विनापरवाना तसेच नोंदणी न करता रस्त्यावर विक्री करण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे सातारा शहरातील 15 आणि कराड येथील 4 विक्रेत्यांची तपासणी मोहीम अन्न औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. त्यामधील सातारा येथील 6 विक्रेत्यांनी व कराड येथील 3 विक्रेत्यांनी परवाना न घेता व उर्वरित 10 विक्रेत्यांनी नोंदणीच न करता विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर अन्न सुरक्षा मानदे नुसार अन्न सुरक्षा रक्षक अनिल पवार, विकास सोनवणे, राहुल खंडागळे यांनी सहाय्यक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नोटीस बजावत कारवाई केली.

सातारा जिल्ह्यामध्ये रस्त्यावरती फळे, वडापाव, चहा, तळलेले मासे, आम्लेट, चायनिज, ऊसाचा रस, असे अनेक अन्न पदार्थ रस्त्यावरती उघड्यावर विक्री केले जातात. या ठिकाणी स्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी अन्न सुरक्षा मानदानुसार सर्व रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्याची एकत्रित कार्यशाळा आयोजित करून त्याना माहिती प्रबोधनासोबत नोंदणी तसेच परवान्याचा लाभ घेता येईल.

रस्त्यावरती कोणतेही अन्नपदार्थ विक्रीकरण्यासाठी शेड्युल 4 चे पालन करताना (31-1) नुसार त्यांचा परवाना घेणे व (31-2) नुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी विक्रेत्यांनी एफ. एस. एस. ऐ. आय च्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सातारा जिल्ह्यात व्यावसायिकांनी परवाने न घेता व नोंदणी न करता अन्न पदार्थाची रस्त्यावर विक्री केल्यास, येत्या काळात अन्न सुरक्षा मानदानुसार कडक कारवाई करणार असल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी जनजागृती मोहिमांचे आयोजन करत असते. त्यासोबत कारवाईचा बडगा देखील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गरजेचा आहे. अन्नसुरक्षा रक्षकाच्या मानदानुसार रस्त्यावरती विनापरवाना अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर भविष्यात कडक कारवाई होणार यामुळे रस्त्यावरती अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांनी तातडीने आपले परवाने काढावेत.

रितसर नोंदणी करावी तसेच ज्यांनी या आधी नोंदणी परवाने काढले असतील त्यांनी देखील कालमर्यादा संपली आहे का ते तपासावे अन्यथा कारवाई होणारच असा इशाराच सातारा अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांनी रस्त्यावरती अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)