उसाला तोड पाहिजे मग एक तरी पॉलिसी काढा

‘सोमेश्वर’च्या चीटबॉयचा अजब फतवा, शेतकरीवर्ग हतबल

“पाडेगाव हे कारखान्याच्या गटामधे समाविष्ट असलेले गाव आहे. गटामधे “अ’ आणि “ब’ असे भाग आहेत. त्यापैकी भाग “अ’ मधील जवळपास सर्व तोडणी संपत आली आहे. मात्र भाग “ब’ मधे अजूनही आठव्या महिन्यातील ऊस तसेच तोडीविना उभे आहेत. कारखान्याकडून जाणीवपूर्वक या तोडी लांबवल्या जात आहेत का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. यामुळे देखील शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे.

लोणंद  – वेगवेगळ्या कारणांनी आधीच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चीटबॉयकडून सुरु आहे. संबंधित चीटबॉय हा विमा प्रतिनिधी असल्याने उसाला लवकर तोड हवी आहे तर माझ्याकडे एक पॉलिसी उतरवा असा तगादा संबंधित चीटबॉयकडून शेतकऱ्यांच्या मागे सुरु आहे. या प्रकारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याची कोंडी करण्याचा प्रकार लोणंद परिसरात सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणंद परिसरातील बहुसंख्य शेतकरी पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. सध्या गळीत हंगाम सुरू असल्याने आपला ऊस लवकर जावा म्हणून शेतकरी कारखान्याच्या चीटबॉय ला आर्जव करताना दिसत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चीट बॉय लोकांना विमा पॉलिसी घ्यायला भाग पाडत आहे.

सातारा जिल्ह्यातील निरा नदी खोरे हा भाग ऊस शेती पट्टा म्हणून ओळखला जाणारा भाग. पाडेगाव, पिंपरे, मिरेवाडी, कुसुर, रावडी, होळ इत्यादी अनेक गावातील शेतकरी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. या परिसरातील खूप मोठे क्षेत्र ऊसाचे आहे. तसेच यंदा या भागातील एका कारखान्याला गाळपाची परवानगी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस लवकर तोडला जावा म्हणून चीटबॉयची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

याच गोष्टीचा गैरफायदा घेत पाडेगाव परिसरात एक चीटबॉय शेतकऱ्यांना ऊस तोड देण्याच्या बदल्यात पॉलिसी काढायची गळ घालत आहे. याबाबत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला पुरावे आणून द्या असे सुनावले आणि नंतरतर उत्तर देण्याचेही टाळले आहे. अशी दोन्ही बाजूंनी मुस्कटदाबी झाल्याने शेतकरी मात्र हतबल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)