बांधकाम संघटनांचे पोलिसांच्या घरासाठी मोलाचे प्रयत्न

पंकज देशमुख : पोलिसांसाठी गृहप्रकल्प प्रदर्शनाचे उद्‌घाटन

सातारा -आयुष्यभर नोकरी करून निवृत्तीची वेळ जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांवर येती त्यावेळी त्यांच्याकडे जिथे आयुष्यभर नोकरी केली त्या ठिाकाणी स्वतःचं घर नसते अशी परिस्थिती मी पाहिली आहे. त्यावेळी गावाकडच्या घराकडे परत जाण्याचा त्यांचा विचार असतो. ही परिस्थिती बदलण्याची गरज असनू सातारा सारख्या छोट्या शहरात हक्‍काचं घर घेण्यासाठी क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेने आयोजित केलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे गृहप्रकल्प प्रदर्शन खरोखच स्त्युत्य असल्याचे उद्‌गार जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने आणि त्याला क्रेडाई आणि बी. आय. सातारा यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे साताऱ्यात अंलकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र येथे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गृहप्रकल्प प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंकज देशमुख बोलत होते. यावेळी अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक समीर शेख, क्रेडाईचे माजी अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब ठक्‍कर, बिल्डर्स असोसिएशन साताराचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, पोलिस उपअधिक्षक रविंद्र साळुंखे, क्रेडाईचे सेक्रेटरी विवेक निकम, बीएआयचे सेक्रेटरी नितीन माने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंकज देशमुख म्हणाले की, समाजात कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावे यासाठी पोलीस प्रशासन कायम सतर्क असते. परंतु अनेकदा त्यांचे आरोग्य आणि रहिवासी ठिकाणे याकडे दुर्लक्ष होत असते. क्रेडाई व बिल्डर्स यांच्या बरोबर पोलीस दलाची भूमिका समन्वयाची असून या बांधकाम संघटनांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. हा मेळावा पोलिस कर्मचा-यांसाठी असून त्यांना अफोर्डेबेल हाऊस या संकल्पनेनुसार मेळाव्यात स्वतःचे हक्काचे घर बुक करण्याची संधी मिळणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्रीधर कंग्राळकर यांनी सांगितले की पंकज देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य किंमतीत घरे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्हयातील विविध गृहप्रकल्पांचा समावेश असून त्याची माहितीही दिली जाणार आहे.

यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष बाळासाहेब ठक्‍कर, बीएआयचे अध्यक्ष सयाजी चव्हाण व समीर शेख यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. यावेळी दोन्ही संघटनांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक़्रमाचे निटनेटके सूत्रसंचालन नितीन माने यांनी तर आभारप्रदर्शन विवेक निकम यांनी केले. यावेळी सर्व स्टॉलची पाहणी करून जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)