खंडाळा – खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.३ रोजी आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गुरुवार, दि. ३ रोजी एका गावामध्ये असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला अपार्टमेंटमध्येच राहणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या घरी घेऊन जात तिचा विनयभंग केला.
या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबीयांना देताच त्यांनी तात्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात पोक्सो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.