सातारा : राजकारणात प्रवेश केल्यापासून शिक्षकांचा सहवास लाभल्याने, कठीण काळातदेखील लढण्याची प्रेरणा मिळत राहिली. शासनाच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीतील विजयाल्याबद्दल आ. घोरपडे यांचा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रहिमतपूर शाखेत सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. वडील कै. भीमराव घोरपडे व आई श्रीमती मंगल घोरपडे हे दोघेही जिल्हा परिषद सदस्य असल्याने, राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळाले. राजकीय कारकिर्दीत शिक्षकांचे सदैव सहकार्य लाभत आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके म्हणाले, आमदार घोरपडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कारकिर्दीपासून शिक्षकांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले आहे. यापुढे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत काम करावे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घ्यावी. शिक्षक बँकेचे माजी व्हाइस चेअरमन मोहन निकम व शिक्षक संघाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष अरुण घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, वसना पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सकुंडे, राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या कोषाध्यक्ष शाबिरा मुल्ला, जिल्हा संघाचे नेते दादासाहेब सरकाळे, महिला आघाडी अध्यक्ष नंदा माने, तालुका संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, प्रवीण घाडगे, रुपेश जाधव, सरचिटणीस प्रवीण गायकवाड, दादासो थोरात, केंद्रप्रमुख राजेंद्र झांजुर्णे, हणमंत खिलारे, कोषाध्यक्ष विनोद बुधावले, बाळकृष्ण पवार, धनाजी चव्हाण, प्रशांत देशमाने, वैभव खाडे, अशोक माने, अरुण साळुंखे, संभाजी भोसले, यशवंत चव्हाण, ग. रा. चव्हाण, दत्तात्रय कुंभार, अशोक सोनवणे, संभाजी देशमुख, गजानन शेडगे, चंद्रकांत राजे, शकुंतला भोसले, योगिता सोनावणे व शिक्षक उपस्थित होते. जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष समीर बागवान यांनी आभार मानले.