फलटण : मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक निधीतून अद्ययावत मंगल कार्यालय बांधून देणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. शुक्रवार पेठ येथील चाँदतारा मस्जिद मध्ये माजी नगरसेवक झाकिरभाई मणेर मित्रमंडळाच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते.
या इफ्तार पार्टीला आ. सचिन कांबळे पाटील , जेष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे पाटील , सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. रणजितसिंह म्हणाले, रमजान हा इस्लाम धर्मातील एक अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात उपास, प्रार्थना, आणि दानधर्म केला जातो. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा वाढण्यास मदतच होते. मुस्लिम समाजासाठी कार्यालय बांधून देणार असून समाजातील बेरोजगार मुलांना नोकरी, व्यवसाय करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार आहे.
माजी नगरसेवक झाकिरभाई मणेर म्हणाले, मुस्लिम समाजासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे कायमच योगदान असते. मुस्लिम समाजातील मुलांमुलीच्या लग्नासाठी आणि इतर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी कार्यालय बांधून मिळावे अशी मागणी केली.
यावेळी गटनेते अशोकराव जाधव माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे , अॅड. नरसिंह निकम, अभिजित नाईक-निंबाळकर, संदीप चोरमले, अमोल सस्ते, अमोल भोईटे, राहुल निंबाळकर, आण्णा घार्गे, राजाभाऊ देशमाने, महामुलकर, रियाजभाई इनामदार तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.