वाई – जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच असून वाई तालुक्यातही बाधितांच्या संख्येत भर पडू लागली आहे. गुरुवार वाई तालुक्यात आणखी 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये वाई पोलीस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे वाईवी पोलीस यंत्रणा हादरुन गेली आहे.
दरम्यान, वाई पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस विभागातील पोलिसांची तातडीने करोना तपासणी करण्यात आली आहे. राज्यासह जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. वाई तालुक्यातही करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे.
गुरुवारी तालुक्यातील 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा वाई पोलीस ठाण्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. वाई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वाईची पोलीस यंत्रणाच हादरली आहे.