सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 96 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून, 507 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 40, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 59, कोरेगाव व खंडाळा प्रत्येकी आठ, वाई 58, रायगाव व पानमळेवाडी प्रत्येकी 51, महाबळेश्वर 25, दहिवडी 101, म्हसवड 15, पिंपोडे 25 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 66, असे एकूण 507 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
एकूण नमुने – 340089
एकूण बाधित – 58064
घरी सोडण्यात आलेले – 55370
मृत्यू – 1848
उपचारार्थ रुग्ण – 846