सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 75 नागरिकांना सोमवारी घरी सोडण्यात आले असून, 650 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 42, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 36, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 17, कोरेगाव 29, वाई 50, खंडाळा सहा, रायगाव 54, पानमळेवाडी 211, महाबळेश्वर 12, म्हसवड 20 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 73, असे एकूण 650 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
एकूण नमुने – 348248
एकूण बाधित – 58994
घरी सोडण्यात आलेले – 55790
मृत्यू – 1855
उपचारार्थ रुग्ण – 1349