सातारा | जिल्ह्यात 44 बाधितांचा मृत्यू; नवे 2217 बाधित

सातारा – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2217 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत तर 44 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या व कंसात आजअखेर एकूण बाधित रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

जावळी 173 (5514), कराड 263 (16191), खंडाळा 134 (6608), खटाव 206 (9177), कोरेगाव 207 (9060), माण 144 (6643), महाबळेश्वर 76 (3370), पाटण 77 (4377), फलटण 278 (13589), सातारा 494 (24626), वाई 134 (8138 ) व इतर 31 (579). जिल्ह्यात आजअखेर करोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख सात हजार 472 इतकी झाली आहे.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या व कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जावळी 0 (104), कराड 10 (449), खंडाळा 3 (85), खटाव 6 (262), कोरेगाव 0 (234), माण 2 (143), महाबळेश्वर 0 (32), पाटण 0 (119), फलटण 6 (193), सातारा 13 (755), वाई 4 (198). जिल्ह्यात करोनामुळे आजअखेर एकूण 2574 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.