सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सोमवारी (दि. 21) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 42 नागरिक करोना संक्रमित झाले असून, गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली.
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रथमच एका दिवसातील करोनाबाधितांचा आकडा पन्नासपेक्षा कमी आला आहे. त्याचबरोबर करोनाबळींची संख्या घटली असली आहे; परंतु करोनामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात पाच, संभाजीनगर दोन, विकासनगर, करंजे, दौलतनगर, वाढे, वेणेगाव, लिंब प्रत्येकी एक, कराड तालुक्यात कराड शहर, बनवडी, पोतले,चिखली (शेरे) प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण शहर एक,
फलटण तालुक्यात फलटण शहर तीन, भाडळी, शिंदे वस्ती, मुरुम प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात निमसोड दोन, खातगुण एक, माण तालुक्यात पळशी तीन, दिवड, म्हसवड, दहिवडी, मलवडी, गोंदवले प्रत्येकी एक,
कोरेगाव तालुक्यात कोरेगाव शहर तीन, जावळी तालुक्यात कुडाळ एक, वाई तालुक्यात बावधन एक, खंडाळा तालुक्यात शिरवळ दोन, लोणंद एक, इतर दोन, असे एकूण 42 अहवाल बाधित आले आहेत.
दरम्यान, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना वाघोली, ता. सातारा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 54 हजार 200 तर करोनाबळींची संख्या 1794 झाली आहे.