सातारा(प्रतिनिधी) – एकीकडे ४० रुग्ण करोनामुक्त झाल्याचा दिलासा मिळाला असताना सोमवारी दिवसभरात ४० जण पाँझिटिव्ह आल्याने सातारा जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ५५६ झाली आहे.
सोमवारी सकाळी ५, संध्याकाळी १७ तर रात्री उशिरा १८ अशा ४० जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.
रात्री उशिरा आलेल्या १८ करोनाबाधितांची तालुकानिहाय आकडेवारी
कराड – वानरवाडी ४
पाटण – जांभेकरवाडी १
वाई – दह्याट १
महाबळेश्वर – हरचंदी १, कासवंड – ३
सातारा – कुस ( बुद्रुक) – २
जावळी – रांजणी १, आंबेघर १
खंडाळा – शिरवळ – १
माण – पिंपरी – ३