सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 251 जण बाधित

 जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 7 हजार 343 वर पोहचली..

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 251 जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यापैकी 37 रिपोर्ट सायंकाळी तर 214 रिपोर्ट रात्री उशिरा आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 7343 झाली आहे. करोनामुळे शनिवारी 12 जणांचा म्रुत्यू झाल्याने आतापर्यंत 226 करोना रुग्णांचा बळी गेला आहे.

रात्री उशिरा आलेल्या अहवालातील 214 बाधितांचा तालुकावार तपशील उद्या सकाळी मिळणार आहे. सायंकाळी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार आलेल्या जिल्ह्यातील 37 पाँझिटिव्ह रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली 1, महाबळेश्वर 13, रांजणवाडी 1, तापोळा 1.,
कराड तालुक्यात कोळे 1.,
वाई तालुक्यातील कन्हुर 1,
खटाव तालुक्यात गुरसाळे 1.,
कोरेगाव तालुक्यात कोरेगाव 2.,
माण तालुक्यातील म्हसवड 1.,
खंडाळा तालुक्यातील पळशी 3, खंडाळा 2, नायगाव 4, शिरवळ 4.,
जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी 2 नागरिकांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.