बुध (प्रतिनिधी) – सातारा येथील डिस्कळ (ता. खटाव) येथे सोमवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले.
डिस्कळ येथे विशाल दिलीप घाडगे यांची पाण्याचे प्लॅस्टिक जार बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या तीन मजली इमारतीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. स्थानिकांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु, आगीत जार उत्पादन साहित्य तसेच इमारतीचे सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाले.