सातारा, दि. 1 (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2383 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या व कंसात आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे. जावळी 117 (4941), कराड 309 (15953), खंडाळा 209 (6474), खटाव 145 (8971), कोरेगाव 273 (8853),माण 123 (6499), महाबळेश्वर 25 (3294), पाटण 71 (4300), फलटण 406 (13361), सातारा 515 (24132), वाई 165 (8004 ) व इतर 25 (548). जिल्ह्यात आजअखेर करोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख पाच हजार 350 इतकी झाली आहे.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या व कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जावळी 1 (104), कराड 7 (439), खंडाळा 0 (82), खटाव 3 (256), कोरेगाव 1 (234), माण 0 (141), महाबळेश्वर 1 (32), पाटण 1 (119), फलटण 3 (187), सातारा 9 (742), वाई 8 (194) , आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2530 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.