574 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 208 नागरिकांना दहा दिवसांनंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले तर 574 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
जावळी तालुक्यातील 11, कराड तालुक्यातील 57, खंडाळा तालुक्यातील 24, खटाव तालुक्यातील सात, कोरेगाव तालुक्यातील 26, महाबळेश्वर तालुक्यातील पाच, माण व पाटण तालुक्यातील प्रत्येकी तीन, फलटण तालुक्यातील 25, सातारा तालुक्यातील 26, वाई तालुक्यातील 21, अशा एकूण 208 नागरिकांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 93, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 32, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 31, कोरेगाव 53, वाई 76, शिरवळ 29, रायगाव 20, पानमळेवाडी 68, मायणी 22, महाबळेश्वर 90, खावली 12 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 48, अशा एकूण 574 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनर दिली.