सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (दि. 5) रात्री आलेल्या करोना चाचण्यांच्या अहवालांनुसार आणखी 173 नागरिक करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली.
गेल्या दोन-तीन दिवसांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर करोनाबळींची संख्याही वाढल्याने जिल्हा प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय आहे. करोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यात उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात धस कॉलनी तीन, केसरकर पेठ, रामाचा गोट, व्यंकटपुरा पेठ, शाहूनगर, कामाठीपुरा, सदरबझार, कार्तिकस्वामी मंदिराशेजारी, भूविकास बॅंक प्रत्येकी एक, इतरत्र दोन, शिवथर 11, नागठाणे सात, जिहे चार, हमदाबाज, कोंडवे, प्रत्येकी दोन, तामजाईनगर, क्रांती सोसायटी, गोपाळकुंज सोसायटी (संगमनगर), फत्यापूर, पाडळी, नेले, कारंदवाडी, अतीत, सोनगाव, कोडोली, कारंडेवाडी, पानमळेवाडी, पाटखळ, गोवे, अंगापूर, गोजेगाव, खेड, क्षेत्र माहुली प्रत्येकी एक,
कराड तालुक्यामध्ये कोळवाडी तीन, कराड शहर, आगाशिवनगर, सुपने, सैदापूर, कुसूर प्रत्येकी एक,
पाटण तालुक्यात ब्राह्मणपुरी एक,
फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात बुधवार पेठ पाच, कसबा पेठ दोन, भडकमकरनगर, लक्ष्मीनगर, हनुमाननगर प्रत्येकी एक, विडणी पाच, जाधववाडी चार, निंभोरे, कोळकी, पिंपळवाडी (साखरवाडी) प्रत्येकी दोन, पिंप्रद, मठाचीवाडी, हिंगणगाव, धुळदेव, रावडी, मुरुम, पाडेगाव, सरकळ, कोळकी, बरड, तरडगाव, मिरेवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज, जाखणगाव, खटाव प्रत्येकी तीन, सातेवाडी, पुसेगाव, पळशी, मोरोळे, दातेवाडी प्रत्येकी एक,
माण तालुक्यात बनगरवाडी पाच, म्हसवड चार, गोंदवले बुद्रुक दोन, मासाळवाडी, पांढरवाडी, ढाकणी, पर्यंती, शिंदी खुर्द प्रत्येकी एक,
कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर दोन, जळगाव, पिंपरे खुर्द, आर्वी, सुर्ली, कुमठे, शिरंबे, एकसळ प्रत्येकी एक,
जावळी तालुक्यात रुईघर चार, अमृतवाडी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात गंगापुरी, सिद्धनाथवाडी, सह्याद्रीनगर प्रत्येकी एक, हवलेवाडी सहा, जांब दोन,
खंडाळा तालुक्यात लोणंद तीन, कणरी दोन, मिरजेवाडी प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात भिलार दोन, खिंगर एक, इतर चार, असे एकूण 173 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 51 हजार 947 झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या हजाराच्या आत आहे.