सातारा : जिल्ह्यातील 116 नागरिक करोनाबाधित

बाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण घटले तरी काळजी आवश्‍यक

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी (दि. 6) रात्री जाहीर करण्यात आलेल्या करोना चाचण्यांच्या अहवालांनुसार आणखी 116 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 52 हजार 63 झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या आत आहे.

ही बाब दिलासादायक असली तरी बाधितांचे मृत्यू पूर्णपणे रोखण्यात अपयश येत असल्याने प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे. नागरिकांनीही पुरेशी काळजी घेताना, करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने चाचण्या व उपचार करून घेणे आवश्‍यक आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात शनिवार पेठ, शाहूनगर प्रत्येकी एक, इतरत्र एक, चिंचणेर वंदन सहा, नागठाणे चार, करंजे पेठ, हमदाबाज प्रत्येकी तीन, शाहूपुरी, गडकर आळी, अंबेदरे, दौलतनगर, तामजाईनगर, शिवथर, परळी, पाडळी, साबळेवाडी, सांबरवाडी, मोहिते मळा, मांडवे प्रत्येकी एक,

फलटण तालुक्‍यामध्ये फलटण शहरात लक्ष्मीनगर, रविवार पेठ, ब्राह्मण गल्ली (कसबा पेठ) प्रत्येकी एक, पिंपळवाडी दोन, तरडगाव, काळज, साखरवाडी, सुरवडी, मुरुम, विडणी, शेरेचीवाडी प्रत्येकी एक,

खटाव तालुक्‍यात राजाचे कुर्ले 11, खटाव सात, पांढरवाडी तीन, पळशी, त्रिमली, जायगाव, गिरीजाशंकरवाडी, तडवळे, पुसेगाव प्रत्येकी एक,

माण तालुक्‍यातील म्हसवड पाच, वळई, देवापूर, गोंदवले बुद्रुक प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव तीन, किन्हई दोन, सातारारोड एक, जावळी तालुक्‍यात जावळवाडी सहा, सोनगाव, सावली, तेटली प्रत्येकी एक,

वाई तालुक्‍यामध्ये वाई शहरात गणपती आळी, सिद्धनाथवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात म्हावशी पाच, लोणंद तीन, खंडाळा दोन, अहिरे एक,

महाबळेश्वर तालुक्‍यात महाबळेश्वर चार, इतर तीन, इतर जिल्ह्यांमधील पुणे, सांगली प्रत्येकी एक, असे एकूण 116 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

करोनाचा हाहाकार सुरू असताना कराड व पाटण हे तालुके सुरुवातीला “हॉटस्पॉट’ बनले होते. या दोन्ही तालुक्‍यांमध्ये काल एकही बाधित रुग्ण आढळला नाही, असे बहुदा प्रथमच घडले असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.